आमच्या विषयी

‘डेक्कन क्वेस्ट पब्लिकेशन’च्या या मराठी वेबसाईटला भेट दिल्याबद्दल आपले आभार. मेन स्ट्रीम मीडियामध्ये साहित्य-संस्कृतीवर आधारित स्वतंत्ररीत्या ओळख निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. आमचे बोधवाक्य ‘हिस्टरी, कल्चर आणि लिटरेचर’ आहे.

कला आणि साहित्य क्षेत्रात आम्ही पहिले व नवीन आहोत, असा आमचा दावा नाही. अशा रीतीने चालणारे असंख्य वेब पोर्टल असू शकतात, परंतु आम्ही प्रकाशित साहित्याच्या मूळ साधनांवर अधिक विश्वास ठेवतो. डिजिटल कॉन्टेटच्या या माहितीप्रधान काळात शॉर्ट स्टोरीचे चलन सामान्य झालेले आहे. हेच कारण आहे की अभ्यासाच्या मूळ साधनापासून आम्ही लांब होत चाललो आहोत.

‘डेक्कन क्वेस्ट’च्या माध्यमातून आम्ही अभ्यागतांना संशोधनासाठी पर्याप्त साधनांची पूर्तता करू इच्छित आहोत. कला, संस्कृती, भाषा, साहित्य तथा इतिहासात असे अनेक मौलिक आणि महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत, जी आमच्या ग्रंथालयातील साचलेल्या धूळीत माखली आहेत किंवा आऊट ऑफ प्रिंट आहेत. ग्रंथालये, लेखक, प्रकाशकांच्या सौजन्य आणि साहाय्याने आम्ही या मूळ ग्रंथांची पाने ‘डेक्कन क्वेस्ट – मराठी’च्या माध्यमातून पब्लिक डोमेनमध्ये आणू इच्छित आहोत.

वर्तमान अवस्थेत अकादमिक संशोधनासाठी वेब पोर्टलचा वापर वाढला आहे. ही गरज ओळखून आम्ही रिसर्चसाठी मूळ तथा ऑथेन्टिक स्त्रोत उपलब्ध करण्याचे काम हाती घेतले आहे. अतिशय सोप्या व साध्या भाषेत आम्ही आपल्या भेटीला आलो आहोत.

विशेष म्हणजे ‘डेक्कन क्वेस्ट पब्लिकेशन’च्या माध्यमातून आम्ही दखनी साहित्य, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जतन आणि संवर्धन कार्य करण्याचा मानस बाळगून आहोत. उत्तर भारताच्या तुलनेत दक्षिणेला नेहमीच दुय्यम दर्जा देण्यात आलेला आहे, या कमतरतेला पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे.

आशयासंदर्भात फीडबॅक देण्यासाठी आपण आपल्या सूचना, सल्ले आणि मते आम्हाला कळवावीत. आमच्या संपर्क करून आपल्या मौलिक सूचना आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. आपला लेख, ऑडियो-वीडियो किंवा सूचना आमच्यापर्यंत पाठवायच्या असेल तर editor@marathi.deccanquest.com या ईमेल आयडीवर संपर्क केला जाऊ शकतो.