बांगलादेश निर्मितीत इंदिरा गांधींची दुर्गादेवींची भूमिका

बंगाली नागरिकांना त्यांचा स्वतंत्र देश निर्माण करण्यासाठी मुजीबुर्रहमान यांनी १९७१ साली पाकिस्तानात भलेमोठे आंदोलन छेडले होते. पाकिस्तानची फाळणी करून पूर्व पाकिस्तानला (सध्याचा बांगलादेश) वेगळा प्रदेश घोषित करावा, अशी मागणी होती. या आंदोलनास इंदिरा गांधी यांनी पाठिंबा दिला आणि पूर्व पाकिस्तानात आपली सैनिकी कारवाई सुरू केली.

परिणामत: पाकिस्तान-भारत युद्ध सुरू झाले. बांगलादेशात परिस्थिती इतक्या टोकाला गेली की तिथलं सामान्य जनजीवन विस्कळीत झाले. तिथल्या गरीब आणी विशेषत: हिंदू नागरिकांना आपलं घरदार सोडून स्थलांतर करण्याव्यतिरिक्त कोणताच पर्याय नव्हता. परिणामी पूर्व पाकिस्तानातून जवळपास एक ते सव्वा कोटी नागरिकांनी भारताची वाट धरली.

सीमेलगतच्या भारतीय राज्यांत लाखो लोक येऊन थडकले. असाम, मेघालय, बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा राज्यांत या विस्थापितांना राहण्याची सोय, अन्न पुरविणे आणि आजाराची विचारपूस करण्याशिवाय या राज्यांच्या शासन-प्रशासनाला दुसरे कोणतेच कार्य उरले नव्हते. सरकारच्या इमारती, शाळा-कॉलेजेस, सामाजिक स्थळे सगळे या विस्थापितांना राहण्यासाठी मोकळी करण्यात आली.

वाचा : ‘संपूर्ण क्रांती’ नव्हे संघाला मान्यता मिळवून देण्याचे कारस्थान

वाचा : पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे

दीड कोटी विस्थापितांचा प्रश्न

भारताची फाळणी करून पाकिस्तानची निर्मिती करणाऱ्यांना पाकिस्तानची फाळणी बांगलादेशाची निर्मिती पलीकडे आणखीन काय महत्त्वाचे असेल. म्हणूनच या संग्रामात इंदिरा गांधी यांनी आपले सर्वस्व पणाला लावले. लक्षावधी विस्थापितांना मदत पुरवण्यात त्यांनी कसलीही कुचराई केली नाही.

पण राजकीय वर्तुळात शासन दरबारी ज्याच्या-त्याच्या सर्वांच्या तोंडावर आणि विचारांमध्ये एकच प्रश्न होता हे युद्ध आपण जिंकू शकू काय आणि जरी ते जिंकले तरी एक-दीड कोटी विस्थापितांना आपण परत त्यांच्या देशात पाठवू शकणार काय? ज्या लोकांनी आपली घरंदारं सोडून भारतात शरण घेतली होती, त्यांची संसारे तिथे उद्ध्वस्त झालेली होती. (काही उरले असेल तर) परत आपल्या देशात जाऊन आपण जगू शकू का, हा विचार त्यांच्या समोर होता.

इंदिरा गांधी त्या वेळी अशा नेत्या होत्या ज्यांना ठाम विश्वास होता की आपण भारतात वास्तव्य करीत असलेल्या सर्व पूर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवणार आहोत. यात बहुसंख्येने हिंदू नागरिक असतानादेखील त्यांना परत पाठवणं इंदिरा गांधी यांनी निश्चय केलेला होता आणि काहींनी त्यांच्या निश्चयावर विश्वास ठेवला तर काहींना त्यांच्या दाव्यावर कसलाच विश्वास बसत नव्हता.

इंदिरा गांधी यांचा विश्वास खरा ठरला. एक ते सव्वा कोटी लोकं तत्कालीन पूर्व पाकिस्तान आताच्या बांगलादेशाला परत गेले. अनेकांना अशी शंका होती की लक्षावधी लोकांची कुठे नोंदच नव्हती. कमीतकमी असे लोक भारताच्या इतर राज्यांत जाऊन राहतील आणि कुणालाही त्यांची ओळख पटवून परत पाठवलं जाणार नाही. पण तसेदेखील काही घडले नाही.

वाचा : करोना महामारीचे सांप्रदायिकीकरण

वाचा : भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?

इंदिरा ठरल्या प्रभावशाली नेत्या

पाकिस्तानबरोबरच्या या युद्धात चीनने भारताला धमकी देण्यापलीकडे काहीही केलं नाही. अमेरिकेत त्या वेळी रिचर्ड निक्सन राष्ट्रपती होते, त्यांना इंदिरा गांधी आवडत नव्हत्या. एकदा इंदिरा गांधी त्यांना भेटावयास अमेरिकेला गेल्या असता निक्सन यांनी दोन-चार तास त्यांना बसवून ठेवले होते.

शेवटी पाकिस्तान आणि अमेरिकेत जिव्हाळ्याचे संबंध होते, असे पाकिस्तानला वाटायचे. अमेरिका नक्कीच भारतावर दबाव टाकून हे युद्ध अधांतरी संपेल असे त्यांना वाटे. अमेरिकेने आपल्या सातव्या आरमारच्या नौका भारताच्या दिशेने हलवल्या त्या वेळी सर्वांना वाटले होते की अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने युद्धात उडी घेईल.

पण तसे काही घडले नाही. सातव्या आरमारचे ते जहाज काही दिवस हिंद महासागरात तरंगत राहिले आणि शेवटी परत गेले. इतर कोणत्याही देशानं भारताविरूद्ध भूमिका घेतली नाही. हे युद्ध भारताने म्हणजेच इंदिरा गांधी यानी जिंकले. स्वतःहून इंदिरा गांधींनी युद्धबंदीची घोषणा केली आणि बांगलादेश हे नवे राष्ट्र उदयास आले.

इंदिरा गांधींनी ते कार्य केले होते जे भारताच्या भल्या मोठ्या लोकसंख्येला अभिप्रेत होते. इंदिरा गांधींकडे देशाच्या सर्व शक्ती एकवटल्या. त्यांच्या तोडीचा, त्यांच्यासारखा प्रभावशाली नेता देशात दुसरा कुणी नव्हता. त्यांची तुलना दुर्गा देवीशी केली जाऊ लागली.

जगप्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांनी याच थीमवर आधारित त्यांचं चित्र काढलं होतं. त्यास खूप प्रसिद्धी लाभली. कोणत्याही पक्षात त्यांच्यापुढे कसलेही आव्हान उभे करण्याची ताकद नव्हती. आपल्याला लाभलेल्या बळाच्या व प्रसिद्धीच्या जोरावर इंदिरा गांधींनी उरल्यासुरल्या विरोधी पक्षांचे आव्हान संपुष्टात आणले. त्यांचा धाक आणि धमकीपुढे कुणाची उभं राहण्याची हिंमत नव्हती.

जाता जाता :