राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवतांनी एका पुस्तक प्रकाशनाच्या समारंभात हिंदुत्व आणि मुस्लिमांविषयी बरीच कथने केली. हे त्यांचे पहिले वक्तव्य नाही. यापूर्वीही त्यांनी मुस्लिम आणि भारत या विषयावर विचार व्यक्त केलेली आहेत. त्यांच्या मते भारताच्या प्रत्येक नागरिकाचा मग त्याचा धर्म, संस्कृती कोणतीही असो, डीएनए एकच आहे.
आजवर असे सांगण्यात येत होते की ‘ब्राह्मण’ आणि ‘क्षत्रिय’ हा आयात वंश आहे. ब्राह्मणांचा आणि युरोपियन लोकांचा डीएनए एकच आहे. पण सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे, असे आधी म्हटले नव्हते. मुस्लिमांचाच नव्हे तर भारतातील साऱ्या लोकांचा डीएनए एकच असेल तर मग जाति-जमाती भेद कशाला?
एससी-एसटींचा देखील डीएनए उच्चवर्णीयांच्या डीएनएसारखाच असेल तर मग शूद्र, दलित, इत्यादी लोक ज्यांना आपण सामाजिक मागास म्हणतो, सारे समानच ठरतील. मग धर्माच्या शिकवणीचे काय? ज्या धर्माने समाजाला भिन्न वर्गात विभागले आणि त्यांचे हक्काधिकार वेगळे ठरवले ते कशाच्या आधारावर? डीएनए एकच असेल तर मग सारे मानव समानच. असो.
आम्ही तर डीएनए समान-असमानच्या भानगडीत न पडता भारतातीलच नाही तर साऱ्या जगातील मानवांना एकच मानतो. साऱ्या माणसांना अल्लाहने निर्माण केले असल्याने आणि या सर्वांचा स्वामी, निर्माता एकच असल्याने सारे मानव समान आहेत. कुणी स्पृश्य वा अस्पृश्य नाही की कुणी तुच्छ, कुणी श्रेष्ठ नाही. यातले जे सदाचारी असतील तेच मात्र अल्लाहला प्रिय असतील.
झुंडीकडून होणाऱ्या मॉब लिंचिंगबाबत भागवतांचे म्हणणे आहे की जे हे कार्य करतात ते हिंदुत्वाच्या विरोधात जातात. त्यांच्याविरूद्ध कडक कारवाई केली जावी. जर खरेच त्यांना असे वाटत असेल की लिंचिंग करणारे हिंदुत्वविरोधी आहेत म्हणजेच ते ‘हिंदू’ नाहीत, तर या गोष्टी एका समारंभात सांगण्यापेक्षा आपल्या संघाच्या वेगवेगळ्या बैठकीत सांगायला हव्यात.
अशा हिंसक प्रवृत्तीना शिक्षा करण्यासाठी आपल्या पक्षाच्या सरकारला, शासनाला सांगायला हवे. एखाद्या सभेत सांगितल्याने काही परिणाम होणार नाही. भाजप-संघाच्या अजेंड्याला अंमलात आणत आहे. भाजपचे लोक हे पाशवी कर्म करत आहेत, पक्षाने त्यांना आवरायला हवे. जर पक्ष कोणतीच कारवाई करत नसेल तर याचा अर्थ खुद्द भाजपचा लिंचिंगला पाठिंबा असावा.
वाचा : कोकणी मुसलमानांचे पूर्वज ब्राह्मण होते का?
वाचा : भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?
वाचा : सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा?
दुहेरी भूमिका
श्रीयुत भागवत यांनी हिंदू-मुस्लिम समानतेची, ऐक्याची गोष्टदेखील सांगितली. ते म्हणाले की, हिंदू असोत की मुस्लिम की इतर धर्मिय सगळे जण भारतीय आहेत आणि भारतीय असल्याने सर्वांचे अधिकार समान आहेत. दुसऱ्या बाजुला ज्या दिवशी भागवत या गोड-गोड गोष्टी सांगत होते, दुसऱ्या दिवशी हरियाणातील भापजचे प्रवक्ते सुरजपाल सिंह यांनी पटौदी येथे एका महापंचायतचे आयोजन केले आणि त्यामध्ये मुस्लिमांना या देशातून हाकलून देण्याचा प्रस्ताव पारित केला.
भाजपचे धोरण वेगळे आणि सरसंघचालकांचे म्हणणे वेगळे कसे? कोण खरे आणि कोण खोटे बोलत आहे, याचे स्पष्टीकरण भागवतांनी करायला हवे. भाजप संघाच्या नियंत्रणाखाली की संघ भाजपच्या नियंत्रणाखाली? संघाचे म्हणणे वेगळे आणि भागवतांचे म्हणणे वेगळे आहे काय?
भागवत म्हणतात, मुस्लिम आणि हिंदू समानरित्या भारताचे नागरिक आहेत. भाजपचे प्रवक्ते म्हणतात मुस्लिमांना या देशात राहण्याचा अधिकार नाही. याचा उलगडा सरसंघचालक आपल्या संघाच्या सभेत करतील काय? इतर कुठल्या ठिकाणी एखाद्या समारंभात असे वक्तव्य करण्यात काहीही अर्थ नाही.
वाचा : ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ बेदखल का झाले?
वाचा : कार्ल मार्क्सवर होता धर्म आणि विज्ञानाचा मोठा प्रभाव
वाचा : मुस्लिम असो की इस्लाम, त्याला कुणाचाच धोका नाही!
धोका एक मिथक
सरसंघचालकांनी आणखी एक विधान याच सभेत केले. ते म्हणजे मुस्लिमांनी असे समजू नये की भारतात इस्लामला धोका आहे. याबाबत हे स्पष्ट करावेसे वाटते की कोणत्याही धर्माला तो इस्लाम असो की हिंदू धर्म असो, की आणखीन कोणताही धर्म असो, बाहेरील शक्तींकडून कसलाच धोका नसतो. आणि इस्लामला तर मुळीच नाही.
कोणत्याही धर्माला त्या त्या धर्माच्या अनुयायींपासून धोका असतो. प्रत्येक धर्मियाने आपल्या धर्माशी एकनिष्ठ होऊन त्याच्या शिकवणींचे पालन केल्यास त्या धर्माला बाहेरील कोणत्याही शक्तीपासून धोका नसतो.
इस्लाम धर्माचे एक वैशिष्ट्य असे की त्याच्या अनुयायींनी इस्लामचे नैतिक पालन केले नाही, वसीम रिज़वीसारख्या लोकांनी धर्माविरूद्ध कर्तृत्व केले तरी इस्लामला या आंतरिक शक्तीपासून कधीच धोका होणार नाही.
जोपर्यंत पवित्र कुरआन आणि प्रेषितांच्या शिकवणी सुरक्षित आहेत तोपर्यंत कधीही ‘इस्लाम खतरे में’ नसेल. पण जे इतर धर्मिय लोक आपल्या धर्माच्या शिकवणी बाजुला सारून लिंचिंगसारखे पाशवी कृत्य करतील त्यांच्यापासून त्यांच्याच धर्माला धोका असणार आहे.
मुस्लिमांना याचा त्रास होणार, पण त्यांना अल्लाहने आधीच सांगितले आहे की त्यांचे प्राण, त्यांची मालमत्ता, त्यांच्या संततीला अशा परीक्षांचा सामना करावा लागणार! तेव्हा मुस्लिमांना हे सर्व सहन करावेच लागेल.
वाचा : प्रशासकीय बदल की लक्षद्वीपच्या संस्कृतीवर हल्ला?
वाचा : ‘मलियाना हत्याकांड’ : तीस वर्षें लोटली, न्याय कधी मिळणार?
वाचा : पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे
इस्लाम फोबिया
इस्लामोफोबिया खरे तर एक मानसिक आजार आहे. फोबियाचा अर्थ भीती आहे. साधारणतः माणसांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते. कुणाला पाण्याची भीती असते, कुत्रा चावल्यावर पीडिताला पाण्यापासून भीती वाटते. त्याला ‘हायड्रोफोबिया’ म्हणतात.
कुणाला उंचीवरून खाली पाहताना भीती वाटते. कुणी विमानाच्या प्रवासाला भीत असतात. अशा कित्येक गोष्टी आहेत ज्यांना विविध प्रकारच्या माणसांना भीती वाटत असते. म्हणजेच हा एक वास्तविक आजार नसून मानसिक आजार आहे. म्हणून सध्या जगातल्या कित्येक ‘सुसंस्कृत सभ्यतां’ना इस्लामची भीती वाटते. ते मानसिक आजारी आहेत. त्याचा उपचार त्यांनी मानसशास्त्र तज्ज्ञांकडून करून घ्यायला हवा.
मुस्लिमाची स्थिती वेगळीच आहे. ते इस्लाम फोबियाने ग्रस्त राष्ट्रांना भीत आहेत. म्हणजे जे स्वतः भित्रे आहेत, त्यांनाच मुस्लिम लोक भिऊ लागले आहेत. जे लोक इस्लाम फोबियाने ग्रस्त आहेत ते मुस्लिमांना भीत नाहीत. त्यांना भीती इस्लाम आणि इस्लामी शिकवण, त्याची नैतिक मूल्ये आणि अशा विचारसरणीची वाटते, की जर ती जगभर पसरली तर त्यांच्या स्वतःच्या वंशवादाला यापासून धोका आहे.
इस्लामची राजकीय व्यवस्था, त्याची अर्थव्यवस्था, त्याचे गत काळातील वैभव आणि नैतिकतेची भीती वाटते. याचे कारण त्यांच्याकडे या इस्लामी व्यवस्थेला रोखण्यासाठी त्याच्या तोडीची कोणतीच व्यवस्था नाही. त्यांच्याकडे नीतीमत्ता नाही.
ऐहिक जीवनाच्या ऐशोआरामात ते इतके व्यस्त झालेले आहेत की जर त्यांच्याविरूद्ध एखाददुसऱ्या व्यवस्थेने आव्हान उभे केले तर ते त्याचा सामना करू शकणार नाहीत. कारण दहशतवादाने प्रेरित मानसिकतेत मानवतेला देण्यासाठी काहीही शिल्लक नाही.
इस्लामच्या सुरुवातीच्या काळात म्हणजे जेव्हा प्रेषित मुहंमद (स) यांनी घोषणा केली की या जगाचा स्वामी एकच आहे. त्याच वेळी मक्केतील लोकांना हे कळून चुकले होते की याचा अर्थ सध्याच्या व्यवस्थेला उलटून लावण्याचा आहे.
म्हणून ते इस्लामला भिऊन, आपल्या ऐहिक सुखसाधनांच्या रक्षणासाठी असमर्थ असल्याची त्यांना जाणीव झाली आणि म्हणून इस्लामच्या उदयाच्या भीतीपासून बचावासाठी ते काही करू शकत नाहीत. त्यामुळे ते भयभीत झाले. त्या काळापासूनच जगाला इस्लाम फोबियाने ग्रासले आहे.
त्यांना हे माहीत होते की ज्या एकमेव अल्लाहची प्रेषित घोषणा करत आहेत त्यांच्या समोर त्यांचे देवी-देवता काही करू शकणार नाहीत. विचारांशी लढा ते देऊ शकत नव्हते. म्हणून विरोधासाठी त्यांनी ज्या लोकांनी प्रेषितांच्या हाकेला प्रतिसाद दिला त्यांच्या जीवावर उठले. अन्याय-अत्याचाराचा मार्ग स्वीकारला.
त्यांना चांगले माहीत होते की हा उपाय त्यांना फारसा टिकू देणार नाही. बघता-बघता दहा वर्षांतच त्या सर्व इस्लामफोबिक शक्तीचा पराभव झाला. अशीच काही स्थिती सध्या आहे. इस्लामचा पुन्हा उदय होऊ नये यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मुस्लिमांच्या कुजलेल्या अवस्थेत देखील इस्लामचे शक्तीकेंद्र पवित्र कुरआन आणि प्रेषितांच्या शिकवणी आजही बाकी आहेत.
त्यांना कधीली संपवता येणार नाही, हे कळून चुकल्याने त्यांनी इस्लामचा राजकीय अर्थाने दहशतवादशी संबंध जोडला. त्यांना इस्लामफोबियाचा राग इतका जडलेला आहे, यातून त्यांची सुटका होणे शक्य दिसत नाही.
वाचा : सार्वजनिक मालमत्ता विक्रीचे गणित काय आहे?
वाचा : ‘ऑक्सफॅम अहवाल २०२१’ म्हणजे विषमतेचा विषाणू
वाचा : करोना महामारीचे सांप्रदायिकीकरण
अफवांचा बाजार
राहिला प्रश्न मुस्लिमांचा तर अल्लाहने त्यांना आधीच सांगितले आहे की त्यांनी इस्लामचा स्वीकार केल्यावर यातना दिल्या जातील, ते त्यांना सहन कराव्या लागतील. फुकटातच या जगती ऐशआराम आणि परलोकात देखील त्यांना वैभवाचे स्थान मिळणार नाही.
पवित्र कुरआनात अल्लाहने स्पष्ट केले आहे की, “तुमची परीक्षा घेतली जाईल, भीतीने, उपासमारीने, तुमच्या घरादारांचे मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागेल. तुम्हाला आणि तुमच्या संततीला या परीक्षेद्वारे पारखले जाईल, यात त्यांचे आणि त्यांच्या आपत्यांचे प्राणदेखील पणाला लागतील.”
मुस्लिमांना या सर्व परीक्षांचा सामना करावा लागणार आहे. त्यांनी अल्लाहची भीती बाळगावी, इस्लाम फोबियाने ग्रस्त प्रवृत्तींना भिऊ नये. कॅनडामधील ज्या व्यक्तीने एका मुस्लिम परिवाराला आपल्या मोटारीखाली चिरडले तो मानसिक भीती ग्रस्त होता.
त्या कुटुंबाकडून त्याला कोणतीच भीती नव्हती, हे त्याला माहीत होते तरीदेखील त्याच्या भीतीची तीव्रता इतकी अधिक होती की त्याने कसलाच विचार केला नाही. अशा मानसिक रोगींना मुस्लिमांनी भीतीत येण्याचे काहीच कारण नाही. इतिहासात एखाद्या मुस्लिम व्यक्तीने परधर्मियाच्या भीतीने असे कार्य कधीच केले नाही कारण मुस्लिमाला अल्लाहशिवाय कुणाचीच भीती नसते जे भितात ते मुस्लिम नसतात.
जाता जाता :
- प्रा. यास्मिन शेख : सदाप्रसन्न वैयायोगिनी
- शासनाच्या मराठी मंडळावर मुस्लिम का नाहीत?
- साहित्य-संस्कृती व्यवहारातील पालखीवाहू ‘मुस्लिम’
लेखक ज्येष्ठ पत्रकार असून गाजिउद्दीन रिसर्च सेंटरचे पदाधिकारी आहेत. इस्लामी तत्त्वज्ञानावर त्यांनी पुस्तके लिहिली आहेत.