माजी केंद्रीय न्यायमंत्री सलमान खुर्शीद, काँग्रेसचे एक प्रमुख नेते आणि सर्वोच्च न्यायालयाचे प्रसिद्ध वकील आहेत. नुकतेच त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले आहे, ज्याचे शिर्षक आहे ‘सनराईज ओव्हर अयोध्या : नेशनहूड इन अवर टाईम्स.’
पुस्तकाच्या प्रचार साहित्यात लिहिले आहे की, सुप्रीम कोर्टाने राम मंदिर निर्माणाचा मार्ग मोकळा केला. जर एक मस्जिद उद्ध्वस्त करणे आस्थेचे संरक्षण आहे, एका मंदिराची स्थापना, आस्थेचा उद्धार आहे तर मग आम्ही सर्वजण मिळून राज्यघटनेत आस्थेचा उत्सव साजरा करू शकतो.
पुस्तकातील ‘द सॅफ्रॉन स्काय’ या प्रकरणामध्ये त्यांनी म्हटले आहे, “ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेसाठी ओळखला जाणारा सनातन धर्म आणि हिंदुत्व गेल्या काही वर्षांत हिंदुत्वाच्या आक्रमक स्वरुपामुळे बाजूला सारले गेले आहे. हे आक्रमक हिंदुत्व आयसिस, बोको हरामसारख्या जिहादी इस्लामिक गटांच्या राजकीय स्वरुपासारखेच आहे”, अशा आशयाचा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे.
आपल्या पुस्तकात खुर्शीद यांनी अयोध्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा जोरात बचाव केला आहे. हे सत्य माहित असून देखील देशाच्या सर्वोच न्यायालयाने हे स्वीकार केले आहे की, 1949 मध्ये चोरट्या मार्गाने लपून छपून रामाच्या प्रतीमा तेथे ठेवणे हे एक गुन्हेगारी कृत्य होते आणि मस्जिद पाडणे हा ही अपराध होता.
वाचा : मनावर आणि जिभेवर लादलेली बंधने म्हणजे स्वातंत्र्यहरणच!
वाचा : भारतात धार्मिक स्वातंत्र्याची अवस्था बिकट का होतेय?
परंतु, कोर्टाने या गुन्ह्याबद्दल कोणालाही शिक्षा केली नाही. जिथपर्यंत दुसऱ्या गुन्ह्याचा प्रश्न आहे, लिब्राहन आयोगाच्या अहवाल भाजपाच्या शीर्ष नेतृत्वाला कोठडीत टाकण्यासाठी पुरेसा आहे. खुर्शीद, खरेतर शांतीचे बोलत आहेत आणि त्या निर्णयाप्रती आपली भूमिका मवाळ ठेवत आहेत ज्याने गुन्हेगारांना सोडून दिले आहे.
वास्तविक, त्यांनी पुस्तकात हिंदुत्वाच्या व्याखेचे विवेचन करताना त्याची तुलना अन्य सनातनी संघटनांशी केली आहे. त्यामुळे या गोष्टीवर गदारोळ उभा राहिला आहे. हिंदुत्वाचे राजकारण करणाऱ्यांनी नैनीताल येथील त्यांच्या घरी गोळीबार केला आणि जाळपोळ केली. त्यांच्या पुस्तकाला हिंदू धर्माचा अपमान करणारे पुस्तक म्हणून दर्शविले.
वास्तविक पाहता खुर्शीद हिंदू धर्माची स्तुती करत आहेत. ते तर हिंदू धर्माच्या नावावर केल्या जात असलेल्या राजकारणाचा विरोध करत आहेत. त्यांच्या सारखेच राहुल गांधींनी हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे वेगळे असल्याचे सांगितले.
वाचा : सावरकरांच्या हिंदुराष्ट्रात वंचितांचे स्थान काय?
वाचा : संघ-परिवाराने राज्यघटनेला विरोध का केला होता?
हिंदू एक धर्म आहे आणि हिंदुत्व राजकारण आहे. इस्लाम एक धर्म आहे, तर बोको हराम व आएसआयएस इस्लामच्या नावावर राजकारण करणाऱ्या संघटना आहेत.
लोकांच्या डोक्यात असे भरले आहे की हिंदुत्व आणि हिंदू धर्म पर्यायवाची शब्द आहेत. हे सांप्रदायिक राष्ट्रवाद्यांना मिळालेले मोठे यश आहे. सावरकरांनी मोठ्या चलाखीने आपली राजकीय विचारसरणी, हिंदुत्वाच्या नावात हिंदू शब्द सामील करून यार केली आहे. यामुळे एका सामान्य हिंदूला असे वाटते की हिंदुत्वावर केलेली टीका म्हणजे त्यांच्या धर्मावर टीका केली आहे.
सावरकर हिंदू राष्ट्रवादाचे जनक आहेत आणि त्यांच्या नजरेसमोर राष्ट्रीय ओळख तीन स्तंभावर आधारित आहे. (1) भौगोलिक एकता (2) वांशिक चिन्ह आणि (3) सांस्कृतिक वैविध्य. सावरकर हिंदूसाठी धर्माच्या महत्त्वाला कमी आखताना म्हणतात की हिंदू धर्म, हिंदुत्वाचा एक गुणधर्म मात्र आहे. (हिंदुत्व, पान-18). या प्रकारे दोन शब्दांमधील अंतर स्पष्ट आहे.
हिंदू धर्माला समजने अवघड कार्य आहे कारण या धर्माचा ना कोणी पैगम्बर आहे, ना कोणते एक पवित्र पुस्तक आणि ना कोणता एक देव. तरीही हिंदू एक ‘धर्म’ आहे, यात कोणतेच दुमत नाहीये.
नेहरू लिहितात की एका धर्माच्या रूपात हिंदू अस्पष्ट, अकार नसलेला आणि बहुपैलू आहे आणि वेगवेगळे लोक याला वेगवेगळ्या दृष्टीने पाहतात. आज आणि इतिहासातही यामध्ये वेग-वेगळ्या आस्था आणि आचरण पद्धती समाविष्ट राहिल्या आहेत.
यामध्ये अनेक गोष्टी एकमेकांपेक्षा वेगळ्या आणि एकमेकांचे खंडन करणाऱ्या आहेत. मला असे वाटते की ‘जगा आणि जगू द्या’ या धर्माचा मूळ आत्मा आहे.
वाचा : दंगलीतून सहिष्णुता अंगीकारण्याचा बोध घ्यावा
वाचा : मनावर आणि जिभेवर लादलेली बंधने म्हणजे स्वातंत्र्यहरणच!
महात्मा गांधी यांनी हिंदू धर्माची व्याख्या करण्याचा प्रयत्न करताना लिहिले आहे, “जर मला हिंदू धर्माची व्याख्या करायला सांगितले तर मी केवळ असे म्हणेन : अंहिसक साधनांनी सत्याचा शोध. कोणी व्यक्ती ईश्वरावर विश्वास न ठेवताही स्वतःला हिंदू म्हणू शकतो. हिंदू धर्म, सत्याचा निरंतर शोध घेण्याचे नाव आहे.” गांधीचा हिंदू धर्म सहिष्णू होता.
त्यापेक्षा, सावरकर यांच्यासाठी हिंदू धर्म हा एक राजकीय उद्देश होता आणि हाच हिंदू सांप्रदायिकतेचा आधार आहे. सावरकर यांच्या अनुसार हिंदू तो आहे जो सिंधूपासून समुद्रापर्यंत पसरलेल्या भूभागाला आपली पितृभूमी आणि पुण्यभूमी दोन्ही मानतो.
त्यांच्या दृष्टीने हिंदू एक वेगळे राष्ट्र आहे आणि भारत भूमीचे मूळ रहिवाशी आहेत. मुसलमान एक वेगळे राष्ट्र आहे. गांधी-नेहरू यांचा समज होता की आमचा धर्म कोणताही असो आम्ही एक राष्ट्र आहोत. गांधीजी यांनी त्यांच्या हिंदू धर्माला परिभाषित करताना म्हटले आहे की, ईश्वर अल्लाह तेरो नाम.
हिंदू राष्ट्रवादी, अर्थात हिंदुत्वाचे राजकारण करणारे, हिंदू धर्म आणि हिंदुत्वाला पर्यायवाची शब्दाच्या रूपात स्पष्ट करत आहेत. अधिक समजून-उमजून असे प्रचारित केले जात आहे की, हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन चालतो आणि त्यांच्यामध्ये एकात्मता प्रस्थापित करत आहे. हीच बाब मोहन भागवतही सांगत आहेत. हा सर्व प्रचार निवडणुकीच्या लाभासाठी केला जात आहे.
हिंदुत्वाच्या अजेंड्यात हे समाविष्ट आहे की इतिहासाचे गौरवीकरण – त्या इतिहासाचे ज्यामध्ये जातीयता आणि लैंगिक उतरंड दगडवारची रेष होती. – ‘विदेशी धर्म’ (ईसाई धर्म आणि इस्लाम)चे राक्षसीकरण आणि गाय, राम मंदिर, लव जिहाद आदीसारख्या मुद्यांवर हिंदुची भावना भडकावणे.
हे घटक असेही मानतात की ख्रिस्ती मिशनरींद्वारा केले जात असलेले ‘धर्मांतरण’ हे ही हिंदुसाठी धोकायादक आहे. थोडक्यात हिंदुत्वाचा अजेंडा अशा नितींना लागू करणे आहे, जो समाजातील उच्चवर्गीयांना लाभ पोहोचवेल आणि गरीबांप्रती फक्त शाब्दिक सहानुभूती व्यक्त करेल.
हा लेख हिंदीत वाचा : सलमान खुर्शीद के घर आगजनी, सांप्रदायिक असहिष्णुता का नमूना
वाचा : पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे
हिंदू धर्म आणि हिंदुत्व हे एक असल्याचे दाखविणे सांप्रदायिक शक्तींची एक राजकीय रणनीति आहे. हिंदुत्व असहिष्णू आहे, हिंसेला प्रोत्साहित करत आहे आणि धार्मिकतेलाही. ते दलित आणि आदिवासींना सोशल इंजिनिअरिंग मार्फत आपले राजकीय हित साधण्यासाठी उपयोगात आणत आहेत. खरेतर, हिंदुत्व त्या राजकारणाचे नाव आहे जे सद्यस्थितीला धरून ठेवण्याबरोबरच समाजाला वर्णावर आधारित जुन्या व्यवस्थेकडे पुन्हा ढकलू पाहत आहे.
आपल्या घरात जाळपोळ झाल्यानंतर खुर्शीद प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देत म्हटले, “मी (माझ्या पुस्तकात) असे म्हटले आहे की जे लोक अशा गोष्टी करतात ते हिंदू धर्माचे नाहीत. हिंदू धर्म हा एक सुंदर धर्म आहे ज्याने या देशाला एक विलक्षण संस्कृती दिली आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. हा हल्ला माझ्यावर नाही तर हिंदू धर्मावर आहे.”
पुढे त्यांनी असे म्हटले की, “मी या लोकांना दहशतवादी म्हणालेलोच नाही. मी फक्त म्हणालो आहे की ते धर्माचा विपर्यास करण्यात सारखे आहेत. हिंदुत्वानं काय केलंय, तर सनातन धर्म आणि हिंदुत्ववादाला बाजूला सारलं आहे. आणि बोको हराम आणि आयसिसप्रमाणेच त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे, असे मी पुस्तकात म्हटले आहे.”
यामधून हे स्पष्ट होत आहे की, सनातनी जे करीत आहेत ते बरोबर आहे. परंतु, हा प्रश्न उपस्थित होतो की, आम्ही या फूट पाडणाऱ्या विचारसरणीचा सामना कसा करावा? समाजात फूट पाडणाऱ्या शक्तींनी सामान्य लोकांना हे समजावून सांगण्यात यश मिळविले आहे की, हिंदू धर्म आणि हिंदूत्व एकच आहे.
काय आम्ही हिंदुत्वाचे नाव न घेता त्याच्या विभाजित करणाऱ्या राजकारणाचा मुकाबला करू शकू? काय आपण हिंदूना हे पटवून देऊ शकू की, हिंदू धर्म तो आहे ज्याला महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांनी परिभाषित केले आहे.
आम्हाला गांधी यांचा हिंदू धर्म व गोडसे आणि त्याच्या साथीदाराच्या हिंदुत्वात फरक करावा लागेल. ज्यामुळे हिंदू धर्माची विविधता आणि मानवीयता या सिद्धान्तावर ठाम राहू शकेल आणि आपण सांप्रदायिकतेच्या अजेंड्याचा मुकाबला करत शांतता आणि बंधुतेवर आधारित समाजाची स्थापना करू शकू.
जाता जाता :
* सेक्युलॅरिझम धर्मीय की राजकीय विचारधारा ?
* मुस्लिम असो की इस्लाम, त्याला कुणाचाच धोका नाही!
लेखक मानवी हक्क कार्यकर्ते आहेत.