डॉ. मुंहमद इकबाल यांच्या तत्त्वज्ञानाचे चिंतन

विवेकानंद, सर सय्यद, रविंद्रनाथ टागोर, शिबली नोमानी, अरविंद घोष, मौलाना आझाद हे आधुनिक भारतातील काही धर्मचिंतक आहेत. या पुर्वकालीन आणि समकालीन दार्शनिकात डॉ. मुंहमद इकबाल यांनी ते ज्या समाजाचे प्रतिनिधित्व करतात त्या समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे.

शाह वलिउल्लाह यांच्यानंतर बुद्धी आणि तर्काच्या आधारे तत्त्वज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात इस्लामचा अर्थ सांगणारे डॉ. इकबाल हे पहिले दार्शनिक आहेत. इकबाल स्वतः तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी होते. त्यामुळे त्यांनी इस्लामी तत्त्वज्ञानाचा अर्थ तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांच्या आणि दार्शनिकांच्या तुलनेत सादर करण्याचा प्रयत्न केला.

डॉ. मुहंमद इकबाल मुलतः कवी म्हणून चर्चेत आहेत. मात्र त्यांच्या कविता या फक्त कल्पनेचा परिपोष नाहीत. त्यांच्या काव्याचा विषय देखील मुलतः तत्त्वज्ञान हाच आहे. ‘जावेदनामा’, ‘असरारे खुदी’, ‘अरसगाने खुदी’ ही त्यांची काही प्रख्यात महाकाव्ये आहेत. यापैकी ‘जावेदनामा’ हे दार्शनिक पार्श्वभूमीवर आधारित ‘संवादी’ फारसी महाकाव्य आहे.

वाचा : इकबाल यांची कविता म्हणजे कामगार हिताचा एल्गार

वाचा : राहत इंदौरी : उर्दूतल्या विद्रोही परंपरेचे वारसदार

पस्तीस विभिन्न पात्रांशी संवाद साधत हे महाकाव्य पूर्ण होते. यात इकबाल यांनी १००हून अधिक दार्शनिकांच्या तत्त्वज्ञानाचा उल्लेख करताना त्यांच्या तत्त्वज्ञानाशी, मतांशी वाद घातला आहे. यासाठी त्यांनी महाकाव्यात आपले अध्यात्मिक गुरू मौलाना रुमी यांना मार्गदर्शकाच्या भूमिकेत उभे केले आहे. त्यांच्या विचारांच्या आधारे इस्लामचे तत्वज्ञानीय रुप स्पष्ट करत ते दार्शनिकांच्या कार्याची समीक्षा करतात.

दांते हे महान विचारवंत होते. ते इकबाल यांच्या अभ्यासाचा विषय. ‘डिवाईन कॉमिडी’ ही त्यांची लॅटीन साहित्यकृती आहे. त्यामध्ये दांतेने वर्जिनला आपला मार्गदर्शक म्हणून उभे केले आहे. तीच पद्धत इकबाल यांनी जावेदनामात रुमींसाठी वापरली आहे.

इकबाल यांच्या या महाकाव्यात ३२ मुख्य पात्रे आहेत. त्यापैकी १२ पात्रे ही कवी, विचारवंत, तत्त्वज्ञ यांची आहेत. याच महाकाव्यात त्यांनी कार्ल मार्क्सला ‘विना जिबराईलचा पैगंबर’ संबोधले आहे. त्यामध्ये इकबाल यांनी मार्क्सचे हृदय आस्तिक आणि बुद्धी नास्तिक होती असा उल्लेख केला आहे. (कल्बे ऊ मोमीन दिमगश काफीर).

इकबाल हे मार्क्स कठोर टीकाकार होते. त्यांनी जमालुद्दीन अफगाणी या आपल्या काव्यातील पात्राच्या साहाय्याने मार्क्सच्या चिंतनाला टीकेचे लक्ष्य बनवले आहे. इकबाला यांचे मार्क्सच्या शोषणविरहित समाजाच्या संकल्पनेशी मतैक्य होते. मात्र वर्गसंघर्षाचा सिद्धान्त मांडून माणसाला नैसर्गिक अवस्थेची समता स्थापित करता येणार नाही, असे त्यांचे ठाम मत होते.

वाचा : शायर ए आजम ‘साहिर लुधियानवी’ स्त्रियांसाठी मसिहा

वाचा : प्रगतिशील कविंच्या उर्दू शायरीतून ‘नेहरू दर्शन’

‘खुदी’चा (self) विकास केल्याशिवाय माणूस शोषणाचा सामना करण्यासाठी सिद्ध होऊ शकत नाही, असे इकबालांचे चिंतन होते. समतेसाठी सांगितलेल्या मार्क्सच्या पाया, इमला सिद्धान्ताच्या पुढे जाऊन इकबाल अतिनिसर्गवादी भूमिका मांडत होते.

मार्क्स ईश्वराच्या अधिसत्तेला आव्हान देत असल्याची टीका देखील इकबाल यांनी त्यांच्या काव्यातून केली आहे. इकबाल यांनी मांडलेली ‘खुदी’ची संकल्पना नित्शेच्या ‘अधिमानव’ (Ssuperman) संकल्पनेसारखी असल्याची टीका केली आहे. मात्र जावेदनामाचे हिंदी अनुवादक मुहंमद शिस खान या आरोपात तथ्य नसल्याचे सांगतात. 

इकबाल यांनी ईसा मसिह यांचा अनुयायी म्हणून टॉल्सटॉयचा गौरव करणारी एक दीर्घ कविता इकबाल यांनी या महाकाव्यात समाविष्ट केली आहे. टॉलस्टॉय है सैनिकी जीवन जगलेला तत्त्वज्ञ होता. त्याने आयुष्यभर ईसा मसिह यांच्या समाजक्रांतीचा इतिहास चिंतनासाठी विषय म्हणून निवडलेला होता. त्यानंतर आपल्या महाकाव्यातील बहुतांश पाश्चात्त्य तत्त्वज्ञांना इशारा देताना ते एका शेरमध्ये म्हणतात,

तुम्हारी तहजीब अपने खंजर से

आप ही खुदकुशी करेगी।

जो शाखे नाजुक पे आशियाना बनेगा,

नापाएदार होगा।।

भावार्थ – समतेचा मार्ग खुदीच्या विकासात कोणताही तत्वज्ञ चिंतनाच्या क्षेत्राकडे सामाजिक हिताच्या परिस्थितीच्या शोधासाठी वळतो.

डॉ. इकबाल यांचे चिंतन याहून वेगळे नव्हते. माणसाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी खुदीच्या विकासाची भूमिका घेतली. या संदर्भात त्यांनी जगातील अनेक तत्त्वज्ञांच्या विचारांचा आधार घेतला.

‘असरारे खुदी’ इकबालांची फारसी मसनवी आहे. त्यामध्ये त्यांनी प्लेटोच्या ‘रिपब्लिक’च्या मांडणीचे इकबाल यांनी कौतुक केले आहे. प्लेटोचा गौरव करताना ते आपल्यावर प्लेटोचा प्रभाव असल्याचे सांगतात,

बर तखय्युलहाए मा फर्मारिवास्त

जामे ऊ ख्वाब आवरो गेतीरुबास्त।।

भावार्थ – आमच्या विचारांवर तो पसरलेला आहे. पेला आहे त्याचा निद्राकारक आणि इंद्रीय जगताचा याचक..

इकबाल यांनी ‘असरारे खुदी’मध्ये ‘मर्हलए दोम जब्ते नफ्स’ भोगीवृत्ती, वासना यांना वेसण घालून खुदीचा विकास कसा करायचा याचे विश्लेषण केले आहे.

जाता जाता :