कलीम खान : पुरस्कार नाकारणारे जगावेगळे वल्ली

ख्यातकीर्त गज़लकार जनाब कलीम खान यांचे १ मे रोजी निधन झाले. दोहें या काव्यप्रकारासाठी खान महाराष्ट्रभर परिचित होते. मराठी, हिंदी आणि उर्दू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. ७ ऑगस्ट १९५४ रोजी जन्मलेले कलीम खान द्विभाषी गज़लकार होते. मराठीसह ते उर्दूतही रचना करीत. सामाजिक एकात्मता व सांप्रदायिकतेवर प्रहार त्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य होते.

#भावपूर्ण_श्रद्धांजली
महान शख्सियत और शायर प्रो. कलीम खान सर इनका इंतकाल हो चुका है

*إِنَّا لِلّهِ وَإِنَّـا إِلَيْهِ…

Posted by साबिर सोलापुरी बदीऊज्जमा बिराजदार on Saturday, 1 May 2021

महाराष्ट्रात ‘मुस्लिम मराठी साहित्य’ अस्तित्वात आली, त्यानंतर अनेक साहित्यिक व कविंना विचारपीठ मिळाले, तत्पूर्वी अनेक कवी व साहित्यिक होते, जे आपल्या रचनांनी मराठी साहित्यात योगदान देत होते. कलीम खान त्यापैकीच एक होते. एकीकडे ज्ञानदान तर दुसरीकडे साहित्यसेवा दोन्ही कार्य त्यांनी उत्तमपणे हाताळली.

डेक्कन क्वेस्ट परिवार त्यांना ‘खरिजे अकीदत’ पेश करत अमोल शिरसाट यांनी कलीम खान यांच्या कार्यकर्तृत्वावर शब्दबद्ध केलेला लेख इथे देत आहोत.

“आपला सन्मान, सत्कार कोणाला नको असतो? काही महाभाग तर आपला सत्कार पैसे देऊन करवून घेतात. अनेक पुरस्कार देणाऱ्या संस्थांचे आयोजकही थोर आहेत. अशा कार्यक्रमांचे आयोजन म्हणजे ‘अर्थपूर्ण’ व्यवहार असतो.

वाचा : कलीम खान : साहित्यातील आधुनिक कबीर

वाचा : राहत इंदोरी : जमिनीशी नाळ जोडलेला कलंदर शायर

पुरस्काराच्या नावावर भरपूर निधी गोळा करून चोरलेली शाल आणि फुटके नारळ सत्कारमुर्तीच्या मस्तकात हाणायचे असा एककलमी कार्यक्रम असतो. असो!

पण यवतमाळ जिल्ह्यातल्या आर्णीचे ज्येष्ठ गज़लकार कलीम खान मात्र सगळे पुरस्कार नाकारणारे जगावेगळे वल्ली होते. कुरआनबरोबरच  वेद, उपनिषद् गीता आणि धम्मपदांचे गाढे अभ्यासक असलेले कलीम खान महाराष्ट्रभरात अनेक ठिकाणी वरील विषयांवर व्याख्यानेही देत असत.

चंद्रतारे, काजवे, सोबतीला घेतले

पण दिव्याचे लेकरू, एकलेच्या एकले .

रक्तरंजित आसवे, साक्ष देती आजही

मीच काटे येथले, पापण्यांनी वेचले .

ज़लकार कलीम खान यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी बरबरोबरच संस्कृत आणि उर्दूवर स्वप्रयत्नातून प्रभुत्व मिळवले. त्यांची उर्दू शिकण्याची गोष्ट तर फारच गमतीशीर आहे. त्यांचे एका मुलीवर प्रेम जडले आणि लागलीच त्यांनी तिला हिंदीत प्रेमपत्र लिहिले.

“विशेष म्हणजे त्यांना प्रेमपत्राचे उत्तर देखील मिळाले. पण अडचण ही झाली की आलेले उत्तर उर्दूत होते. कलीम खान यांना काही वाचता येईना कारण शालेय शिक्षण मराठीतून झालेले. मग त्यांनी उर्दू शिकण्याचा चंग बांधला आणि आठ-दहा दिवसातच ते उर्दू वाचायला शिकले.

// चॉंद की टहनियॉं // १६४ //
( इस आइंदा किताब से )

टहनी : १६४ ( ग़ज़ल )

मेरे किस काम की तेरी आसानियॉं
ओढ़ता मैं …

Posted by Kaleem Khan on Wednesday, 24 February 2021

वाचा : मराठीतील ‘कोहिनूर-ए-गझल’ इलाही जमादार

वाचा : डॉ. दाऊद दळवी : एक व्यासंगी इतिहासकार

अशा रीतीने त्यांनी आपल्या आयुष्यभराच्या जोडीदाराचा हात हातातून सुटू दिला नाही. तसे त्यांचे कवितेवर देखील कोवळ्या वयातच प्रेम जडले. आर्णीत होणाऱ्या ऊरुसांच्या निमित्ताने रात्रं-रात्रभर देशभरातील अव्वल दर्जाच्या कव्वालांच्या मैफिली रंगत. तेव्हा नकळतपणे कलीम खान यांच्यावर गज़लेतील वृत्तांचे देखील संस्कार झाले.

त्यांना गझलेची खरी ओळख झाली ती सुधाकर कदम यांच्या संपर्कात आल्यानंतर! कदमांच्या अनेक गज़लमैफिलींचे निवेदन कलीम खान करायचे. त्यांच्या निवेदनाचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांची समयसूचकता आणि हिंदी-उर्दू-मराठीतील तमाम शायरांचे शेर, गझला आणि कविता यांचे जबरदस्त पाठांतर!

त्यांची गज़लही अत्यंत वेगळ्या धाटणीची आहे. त्यांच्या गज़लेत प्रेमाबरोबरच देशभक्ती, सांप्रदायिकता, एकात्मता आणि हिंदू-इस्लाम मिथकांचा अनोखा संगम आढळतो.

मीच दिल्ली, मीच केरळ, मीच हिंदुस्थान आहे

मरणही माझे भुईला, कुंकवाचे दान आहे

बाबरी मस्जिद असो वा जन्मभू पुरुषोत्तमाची

माझियासाठी अयोध्या आदराचे स्थान आहे!

वाचा : मराठी ज्ञान, रोजगाराची आणि अभिजात होण्याची त्रिसूत्री!

वाचा : डॉ. अक्रम पठाण : मुस्लिम मराठी साहित्याचे साक्षेपी अभ्यासक

इतका उदात्त दृष्टिकोन केवळ माणुसकी हा धर्म असणाऱ्यांचाच असतो. कलीम खान मुस्लिम असले तरी  त्यांच्या मते माणसाचा धर्म कोणताही असो पण त्याची संस्कृती बदलत नसते. त्यांच्या रक्तात येथील संस्कृती मिसळलेली आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेतून जी प्रतिमाने येतात ती याच मातीतून उगवलेल्या सस्कृतीमधील आहेत.

रुढार्थाने निधर्मी असलेल्या कलीम खान यांची गौतम बुद्ध, श्रीराम, कृष्ण, येशू ख्रिस्त आणि प्रेषित मुहंमद ही सर्व श्रद्धास्थाने आहेत. त्यामुळेच कलीम खान जितक्या हक्काने कुरआन वर बोलतात तितक्याच हक्काने ते गीता आणि धम्मपदांवरही बोलतात. या सर्वांचे मिश्रण त्यांच्या काव्यामधे दिसून येते. म्हणूनच ते ज्ञानेश्वरांसारखे पसायदानही मागतात –

अभिमान जिंकण्याचा मजला कधी न होओ

अन् हारलो तरीही त्रागा कधी न होओ

आपल्यातला अभिमान दूर करता आला की मग कुठल्याच गोष्टीचा त्रास होत नाही. एकदा का मीपणा दूर झाला की हरण्याला किंवा जिंकण्याला फारसे महत्त्व राहत नाही. कलीम खान यांच्याप्रमाणे स्थितप्रज्ञवृत्तीने जीवनाकडे बघता येते. जगात अनेक लोकांना त्यांच्याकडे असलेल्या संपत्तीचा, सौंदर्याचा, शक्तीचा निरर्थक अभिमान असतो. त्यांच्यासाठी एक सुंदर शेर आहे

सौंदर्य हे तनांचे वाटे जया चिरंतन;

त्यांनी उजाड, पडक्या वाड्याकडे बघावे

कधीतरी संपन्नतेने नटलेले वाडे आज उजाड आणि भकास दिसतात. कधीतरी त्या वाड्यांना, वाड्यातल्या लोकांना संपन्नतेचा अभिमान असेल. पण आज काय परिस्थिती आहे? भिंती खचल्या आहेत, छत कोसळले आहेत. संपन्नता होती म्हणून आसऱ्याला असलेले लोकही परागंदा झाले आहेत.

मरणपंथाला लागलेल्या वाड्यासोबत आहे ते त्याचे उदास आणि भयाण एकाकीपण. म्हणूनच खोटा अभिमान बाळगून कोणाचे भले झाले? कलीम खान यांची गज़ल चिंतनशील आहे.

गज़लेप्रमाणेच कलीम खान यांची ‘दोहा’ या काव्यप्रकारवर चांगली पकड आहे. ते दोह्यामध्ये सुद्धा आजच्या काळातील प्रतिमा घेऊन जीवनाचे तत्त्वज्ञान मांडण्याचा प्रयत्न करतात –

जिसे कहे तू जिंदगी तालमेल का खेल

सिग्नल जबतक है सही, पटरी पर है रेल

जीवनाचा ताळमेळ साधला जाणे अत्यंत आवश्यक असते. पाप-पुण्य, बरे-वाईट, खरे-खोटे यातल्या सीमारेषा फारच धुसर असतात. चांगल्या गोष्टींचा अतिरेकही कधीकधी जीवनाचे वाटोळे करू शकतो. कधीकधी इतरांच्या भल्यासाठी खोटेही बोलावे लागते.

वाचा : विज्ञानयुग आणि विज्ञानसाहित्य

वाचा : नवीन लेखकांसाठी पुस्तके प्रकाशित करण्याची सोपी प्रक्रिया

सत्यवादी हरिश्चंद्रासारखं जीवन कोणालाही जगता येत नाही. त्यामुळे जीवनामध्ये ताळमेळ आवश्यक आहे. असे जीवनाचे तत्त्वज्ञान कलीम खान आपल्या काव्यातून मांडतात. त्यांच्या गज़लेतील भाषा थोडी जुनी वाटते, तुरळक गज़लांमधे शेरांची संख्याही जास्त आहे पण ते जे काही ते लिहितात ते त्यांचे स्वतःचे आहे. त्यात कोणाचेही अनुसरण नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे.

कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यपदावरून निवृत्त झालेल्या कलीम खान यांनी आपल्या संपूर्ण नोकरीच्या काळामधे केवळ विद्यार्थ्यांचाच विचार केला. स्वतःची माहिती स्वतःच द्यावी लागत असल्याने शिक्षण विभागाने देऊ केलेला ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काररही नाकारला.

त्यांच्या नावावर आजवर ‘गज़ल कौमुदी’ (२०१९) हा एकमेव संग्रह आहे. या संग्रहामधे त्यांनी गज़ल अभ्यासकांसाठी गज़लेचे वृत्तशास्त्र व ‘रुबाई’या गज़लेच्या उपप्रकाराबद्दल सविस्तर माहिती अंतर्भूत केली आहे.

‘कलीम के दोहे’ (२०१९) हा त्यांचा हिंदी दोह्यांचा संग्रह देखील प्रकाशित झाला आहे. त्यांनी ‘मंजर’ हा हिंदी-उर्दू गज़लांचा संग्रह देखील संपादित केला आहे. त्यांचे ‘चाँद की टहनिया’ (उर्दू गज़लसंग्रह), ‘सूर्याच्या पारंब्या’ (मुक्तछंद) व ‘कलीमच्या रुबाया’ हे तीन संग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.

मनात साठलेले जेव्हा ताकदीने बाहेर येईल तेव्हाच लेखणीचे माध्यम निवडणाऱ्या शायर कलीम खान यांची एक गज़ल –

निवडुंग ओळखीचे, नात्यातल्याच बोरी

पण सावलीस त्यांच्या थांबू नकोस पोरी

रचणे कठीण गोट्या, जर एकदा विखुरल्या

जीवन नव्हेच पोरी खेळातली लगोरी

कुठल्याच माणसाचा  देऊ नको भरवसा

बाभूळ गावची ज्या त्या गावच्याच बोरी

नाहीच भूक तुजला  मी जाणतो तरीही

थोडी तरी असू दे सोबत तुझ्या शिदोरी

सारे चतूर त्यांचे  लिहिणे कधीच झाले

मी वेंधळाच माझी पाटी अजून कोरी”

जाता जाता :