गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

हान सुफीसंत आणि संगीतज्ज्ञ अमीर खुसरौ हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. खुसरौंचे मूळ नाव अबुल हसन यमीनुदीन खुसरौ (१२५३-१३२५) असं होतं. पण त्यांना अमीर खुसरौ म्हणून ओळखलं जात होतं. खुसरौंनी १३व्या आणि १४व्या शतकातील भारत पाहिला होता. त्यांनी तब्बल ७ शासकांची राज्ये पाहिली होती.  

खुसरौंचे वडील मलिक सैफुद्दीन हे तुर्कीच्या टोळीचे सरदार होते. ते बादशाह अल्तमश यांच्या शासनकाळात भारतात आले होते. त्यांचं लग्न राजपूत (राजस्थान) वंशाचे शासक बलवनचे युद्ध मंत्री इमादुल्मुल्क यांच्या मुलीशी झालं, जे उत्तर प्रदेशच्या एटा जिल्ह्यातील गंगा नदीच्या किनारी असलेल्या पटियाली भागात राहत होते. लग्नाच्या दोन वर्षांनंतर २७ डिसेंबर १२५३ला अमीर खुसरोंचा जन्म झाला.

अमीर खुसरोंविषयी अभ्यास करणाऱ्या अनेक तज्ज्ञांचं मत आहे की, खुसरोंनी शायरी किंवा संगीताचे कुठलेही औपचारिक शिक्षण घेतलेलं नव्हतं. प्राथमिक शिक्षणासाठी त्यांना तज्ज्ञ व विद्वान शिक्षक होते, पण त्यांनी आपल्या साहित्यिक व सांगतिक जडणघडणीसाठी कोणत्याही गुरुचा आधार घेतला नाही.

वाचा : कशी होती तुघलक काळातील ईद?

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

हेच कारण आहे की त्यांच्या लिखाणावर कोणाचाही प्रभाव जाणवत नाही. त्या काळात पर्शियन आणि तुर्की भाषेत दर्जेदार कविता व शायरी केली जात. अरबी भाषेसाठीही पूरक परिस्थिती होती. ‘हिन्दवी’ भाषादेखील विकसित व्हायला सुरुवात झाली होती. अमीर खुसरोंसारख्या विद्वानांनी देशी व विदेशी अशा दोन्ही भाषांमध्ये अर्थात फारसी, तुर्की, हिन्दवीमध्ये अद्भूत रचना केल्या.

खुसरौचं आणखी एक वैशिष्ट्य होतं ते म्हणजे, ते गजल लिहिण्यासोबत त्याचे गायनदेखील करीत. ते एक उत्तम गायकसुद्धा होते. आपल्या शायरी गायनासंदर्भात ते लिहितात, ‘एकदा सकाळी, शहराच्या (दिल्लीच्या) कोतवालाने पत्र लिहिण्यासाठी माझ्या शिक्षकांस बोलावलं. ते दौत (शाई) आणि लेखनपात्र घेऊन निघाले, तेव्हा मी देखील त्यांच्या सोबत चालायला लागलो. जेव्हा तेथे पोहोचलो तर एक गायक कुठल्यातरी रचनांचे वाचन करीत होते. माझ्या शिक्षकांनी मलादेखील गाण्यास सांगितलं.’

ते उपस्थितांना म्हणाले, ‘माझा हा लहान शिष्य शायरीच्या नभांगणातून ताऱ्यांना स्पर्श करतोय. याला देखील गाण्याची संधी द्या.’ होकार मिळताच खुसरोंनी सादरीकरण सुरू केलं. खुसरोंनी एक शेर इतक्या दर्दभऱ्या ढंगात पेश केला की, ऐकणाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.

वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल

वाचा : कथा बिजापुरच्या गोलगुंबजच्या जन्माची

खुसरौंच्या तारुण्याचे ते दिवस होते. वाढत्या वयासोबत त्यांच्या शायरीलादेखील रंग चढत होता. त्यांची गायनेदेखील रससमृद्ध व्हायला लागली. अल्पावधीतच त्यांची शायरी प्रसिद्ध झाली. इतकेच नव्हे तर, त्यांच्या शब्दांना दिल्लीचे प्रसिद्ध गायक आपल्या रागांमध्ये स्वरबदद्ध करू लागले. या गीतामुळे खुसरौंची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढायला लागली. शाही दरबारापासून, लहान मोठे अमीर, सरदारांच्या खास आणि खाजगी मैफलींसाठी त्यांची मागणी वाढली.

खुसरौ दिल्लीच्या संस्कृती, संगीतात विशेष योगदान देत होते. मात्र ते संगीत कोणत्या प्रकारचं होतं? संपूर्ण हिंदुस्तानी? संपूर्ण मध्य आशियाई? इराणी? तुर्की? अरबी? अफगाणी? नाही, हे तेच संगीत होतं, ज्याला आजदेखील आपण गंगा-जमुनी संमिश्र संगीताच्या नावाने ओळखतो.

या संगीतात अरब वाळवंटात वाहणाऱ्या वाळूच्या वादळाचे स्वर होते. तर उजबेकीस्तान, तुर्की आणि इराणच्या बागांमध्ये गुणगुणणाऱ्या कोकीळेची झलक होती. त्यात हिंदुस्तानी नद्यांचे प्रवाहगीत होते. तसेच पहाटेच्या वेळी किलकिल करणाऱ्या पक्ष्यांचा आवाज देखील होता. मातांची अंगाई गीते होती. तर विरहाच्या ज्वाळेत जळणाऱ्या सुहासिनींचं दुख होतं.

खुसरोंच्या संगीतात हे सर्व हिंदुस्तानी घटक खोलवर रुजलेली आणि सामावलेली होती. आजही या संगीताचे स्वर जगातील चारही दिशांमध्ये निनादत असतात. खुसरौंना जाऊन ७५० पेक्षा अधिक वर्षे झाली तरीही आजदेखील त्यांचं नाव सन्मानाने व आदराने घेतलं जातं.

खुसरौंनी तीन तारांचा ‘सितारा’ विकसित केला. सितारच्या तीन तारांतून त्यांनी गायनात वेगवेगळे प्रयोग करून त्याचे लाभ घेतले. त्यांनी या सितारच्या स्वरांना देखील हिंदुस्थानी स्वरूप दिलं. बोटांच्या हालचाली आणि सितार छेडणाऱ्या पद्धतीत ‘मिजराब’मध्ये त्यांनी परिवर्तन आणलं.

सितारशिवाय ढोल, ढोलकी आणि ढोलक म्हणून परिचित असणारे भारतीय वाद्यदेखील खुसरोंविषयी कृतज्ञता व्यक्त करतात. ढोल, ढोलकी आणि ढोलकच्या आधी आपल्या देशात पखवाज होते.

खुसरो आकाराने लांब असणाऱ्या पखवाजला तबल्याचे रुप दिले. जे तबला, तबलचाच्या रुपात मध्य आशियाई देशात वापरलं जात असत. खुसरोंनी त्याला फक्त भारतीय रुप दिलं नाही तर त्याचं वेगवेगळे स्वरदेखील निर्माण केले. ज्याचा वापर आजही अनेक वादक तबला वाजवताना करतात.

अमीर खुसरौंना धृपदकार म्हटलं जातं. अब्दुल हलीम जफर खाँ साहेबांसारख्या प्रख्यात संगीततज्ज्ञ आणि अन्य संगीतकारांनी अमीर खुसरौंचं संगीत, गायन आणि त्यांच्या वाद्यनिर्मितीतील योगदानाचं खूप कौतुक केलं आहे. दुर्दैवाची बाब अशी की, आपल्याकडे देशात आणि देशाबाहेर, लहान मोठ्या संगीत मैफलीत अमीर खुसरौंसारख्या महान संगीतकाराचे स्मरण चुकूनदेखील केलं जात नाही. कधी-कधी अधून-मधून कव्वालांच्या तोंडून खुसरौंचं नाव घेतलं जातं.

खुसरौंनी अरबी-फारसी ‘कौल’चं अशा पद्धतीने हिन्दवीकरण केलं की, आज कव्वालच नव्हे तर, हिंदू भजन कीर्तनाचे समूहदेखील भक्तिगीतेदेखील कव्वालीसारखीच गातात. त्यांना याची पुसट कल्पनादेखील नसावी की, जी गीते ते गात आहेत, साडे-सातशे वर्षापूर्वी अमीर खुसरो नावाच्या एका महान व्यक्तीने त्याची निर्मिती केली होती.

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

वाचा : अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

हा महान व्यक्ती व संगीतज्ज्ञ आज दिल्लीत आपले महान गुरू निजामुद्दीन औलिया यांच्या समाधीच्या चरणकमलापाशी चिरनिद्रा घेत आहेत. खुसरोंची ‘मजार’ त्यांचे गुरू आणि हजरत निजामुद्दीन यांच्या शेजारीच आहे. या महान गुरू-शिष्याच्या जियारतसाठी आजही दिल्लीच्या ‘निजामुद्दीन’ भागात भाविकांची अलोट गर्दी असते.

दोन्ही गुरू-शिष्यांच्या मजारचे दर्शन घेताना स्वाभाविकपणे भाविकांच्या हृदयात भावकल्लोळ माजतो. डोळ्यांसमोर या महान व्यक्तिंच्या प्रतिमा आणि त्याकाळच्या दिल्लीचं दृश्य उभं राहतं. असं वाटू लागतं की, अमीर खुसरौ मोठ्या रुबाबात घोड्यावर स्वार आहेत आणि सर्वांच्या नजरा ते आपल्याकडे खेचून घेत आहेत.

दुखद बाब ही की, भारताच्या या महान सुपुत्राच्या ‘मजारी’जवळ त्यांची साधी माहितीदेखील मिळत नाही. ज्यामध्ये त्या राष्ट्रनिष्ठ हिंदुस्थानीच्या संस्कृतीचे थोडेसं प्रतिबिंब असेल. ही किती दुर्दैवाची बाब आहे की, आम्ही आज आपल्या पूर्वजांचं स्मरण करण्याचा आणि त्यांच्या संस्मरणांना जपण्याचा दावा करत असतो. मग अमीर खुसरौंची अवहेलना का केली जात आहे?

दिल्लीत कितीतरी लोकांच्या नावावर रस्ते आहेत. मग अमीर खुसरौंच्या नावे एखादा रस्ता का नाही? त्यांच्या नावावर स्वतंत्र अकादमी का नाही? भारत सरकारने त्यांच्या स्मृतिपित्यर्थ एखादा स्वतंत्र भवन का उभा करू शकला नाही?

त्यांच्या नावावर देशात एकही संग्राहलय का नाही? अपेक्षा करुयात की अमीर खुसरौंवर पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर संशोधन होईल आणि त्यांचे एक राष्ट्रीय स्मारक स्थापित होईल.

जाता जाता :

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.