अहमदनगर : मध्ययुगीन भारतातील ऐतिहसिक शहर

भारतात आलेल्या परदेशी प्रवाशांनी ज्या शहरांच्या नगररचनेचे कौतुक केले आहे, त्यात अहमदनगरचा समावेश होतो. तुघलकाबादच्या वास्तुशैलीने तत्कालीन जगातील विद्वानांवर असाच प्रभाव निर्माण केला होता. पण तुघलकाबादच्या तुलनेत अहमदनगरची वैशिष्ट्ये निराळी आहेत.

सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून या शहराची रचना करण्यात आली होती. त्यामुळे नुसत्या शाही वास्तूंमुळे अहमदनगर शहर चर्चेत होत असे नाही. तर त्याच्या नागरी सुविधांनीही त्याकाळी चर्चेच्या परिघात स्थान मिळवले होते. अहमदनगर शहरात आजमितीस त्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करणाऱ्या अनेक इमारती आहेत. त्याची आपण माहिती घेऊ यात.

सलाबतखान (दुसरा) याचा मकबरा

शाह डोंगरावर अहमदनगर शहरापासून १२ किलोमीटर अंतरावर, सलाबत खान (दुसरा) याची कबर आहे. चौथा निजामशाहच्या (१५६५-८८) कारकीर्दीत सलाबत महान राजकारणी आणि दरबारी कामकाजाचे मंत्री होते. त्याने आपल्या आयुष्यात ही इमारत बांधली होती. मृत्युपश्चात त्याला इथे दफन करण्यात आले आहे.

ही इमारत तीन मजली आणि अष्टकोनी आहे. स्थानिक रहिवाशांचांदबीबीचा महल म्हणून ही इमारत प्रसिद्ध आहे. पण वास्तविकतः चाँदबीबी आणि या इमारतीचा काहीही संबंध नाही. स्थानिक दंतकथामुळे अनेक ऐतिहासिक ग्रंथातही ‘चाँदबीबी महाल’ म्हणून या इमारतीचा उल्लेख आढळतो.

सलाबत खान यांनी ईसवी सन १५८०मध्ये ही देखणी वास्तू बांधली. इमारत सुमारे ७० फूट उंच आहे आणि गॅलरी सुमारे २० फूट रूंद आहे. या ठिकाणी, सलाबत खान यांच्याशिवाय त्यांच्या दोन बेगम आणि मुलांचीदेखील कबर आहे.

वाचा : प्रशासकीय बदल की लक्षद्वीपच्या संस्कृतीवर हल्ला?

वाचा : पश्चिम बंगाल निवडणुकीत काँग्रेसची ‘मुस्लिममुक्त’ धोरणे

दमडी मस्जिद

अहमदनगर किल्ल्याजवळ स्थित दगडामध्ये कोरीव काम केलेली आकर्षक मस्जिद आहे. ईसवी सन १५६७मध्ये  साहिर खान यांनी ही ‘दमडी मस्जिद’ बांधली होती. मस्जिद नक्षीकामासोबतच, त्याच्या जाळ्या, परिसरात लावलेल्या शिलालेखांसाठी प्रसिद्ध आहे. परिसरात युरोपियन आणि इतर लोकांच्या कबरी आहेत. आदिलशाही वास्तुंसारख्या इराणी शैलीत निर्माण केलेल्या या पुरातन वास्तूची प्रतिकृती गुजरातमध्येही आढळते.

कोटला बारा इमाम मस्जिद

या मस्जिदीला बारा इमामांचे कोताळा (बारा संतांचा किल्ला) असे म्हणतात. ईसवी सन १५३६मध्ये बुरहान निजाम शाह यांनी त्यांचे मंत्री शाह ताहिर यांच्या मार्गदर्शनाखाली या वास्तुची निर्मिती केली होती. बुरहान निजाम शाहने कालांतराने ही मस्जिद शाह ताहिरच्या ताब्यात दिली. आणि ती एक धर्मादाय संस्था आणि महाविद्यालय म्हणून वापरात येऊ लागली.

ही मस्जिद कुंपणाची भिंत (९१X९१ मीटर) दगड आणि चुन्याचा वापर करुन बांधली आहे. पूर्वेस व दक्षिणेच्या बाजूला दोन दरवाजे आहेत. बारा इमाम ‘कोटला मस्जिद’ निजामशाही वास्तुकलेचा एक उत्कृष्ठ नमुना आहे. ही मस्जिद त्याच्या कोरलेल्या आणि सजावलेल्या कमानीसाठी प्रसिद्ध आहे.  या मसजिदीत कुरआनच्या तीन आयतींचे एकच प्रार्थना सभागृह आहे, सभागृह पाच फूट खोल आहे आणि त्यावर सपाट छत आहे. इराणी वास्तुकला, सुबक रचना आणि उत्तम नक्षीकामाचे हे अतिशय सुंदर उदाहरण आहे.

कोट बाग निजाम

बहमनी राजवटीने सूड उगवण्याचे प्रयत्न सुरू केले होते. त्यावेळी अहमद निजामशाह ज्याला कालांतराने मलिक अहमद म्हणून ओळखले जाते, त्याने दौलताबाद नष्ट करण्याचा निर्णय घेतला. अहमदनगरच्या ७५ मैलांवर दक्षिण-पश्चिम असलेल्या दौलताबादच्या काही अंतरावर येण्यासाठी त्यांनी अहमदनगरला पुण्याजवळील जुन्नर येथून आपले मुख्यालय हलविले.

१४९४ मध्ये सिना नदीच्या डाव्या काठावर अहमदनगर शहराची स्थापना केली. शहराच्या मध्यभागी त्याने ‘बाग ए निजाम’ची निर्मिती केली. या बागेला ‘विजय बाग’ म्हणूनदेखील इतिहासात ओळखले जाते. सन १४९९मध्ये मलिक अहमदने दौलताबादच्या किल्ल्यावर विजय मिळवला आणि बहमनी साम्राज्याचा नाश केला.

या दुसऱ्या विजयाची आठवण म्हणून त्यांनी ‘बाग निजाम’ भोवती भिंत बांधून घेतली. या बागेच्या नंतर अहमदनगर किल्ला बांधण्यात आला.

वाचा : खुल्ताबादचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा

वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’

अहमदनगर भुईकोट किल्ला

या किल्ल्याला ५०० वर्षांचा इतिहास असून निजामशाहीचा संस्थापक अहमद बादशाहाने शहर वसविण्यापूवी ईसवी सन. १४९०मध्ये हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा परिघ १ मैल ८० यार्ड इतका असून किल्ल्यास २२ बुरुज आहेत. किल्ल्याभोवती अभेद्य तटबंदी आहे व त्याभोवती विस्तीर्ण खंदक आहेत. खंदक ओलांडण्यासाठी ब्रिटिशांच्या काळात ईसवी सन १८३२ मध्ये मागील बाजूस झुलता पूल बांधण्यात आला होता. अजूनही या पुलाचे अवशेष बाकी आहेत.

बाग रौझा

हे ऐतिहासिक स्मारक काळ्या दगडांनी बांधलेले आहे. एकेकाळी ही इमारत अहमद निजामशाह यांचे निवासस्थान होते. ही इमारत १६व्या शतकात राजा निजामी यांनी बांधले होते. हे संपूर्ण स्मारक काळ्या दगडापासून निर्माण केलेले आहे.
वर्षभर पर्यटक येथे भेट देतात. जवळच एक दगडी स्मारक आहे. इसवी सन १५६५मध्ये विजयनगरच्या राम राजाच्या विरोधात बरिदशाही, आदिलशाही आणि अहमदनगरच्या निजामशाहीने संयुक्त युद्ध पुकारले होते. या युद्धाला ‘तालिकोटचे युद्ध’ म्हणून ओळखले जाते. यात निजामशाही घराण्यातील गुलाम अली हत्तीने दाखवलेल्या पराक्रमाची स्मृती म्हणून त्याचा मकबरा बांधला आहे. तो मकबरा  बाग रौझाच्या जवळ आहे.

फरिया बाग पॅलेस

ही वास्तु निजामशाहचा मुलगा बुरहान शाहच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधली आहे. हा बुरहान निजामशाह सातव्या वर्षी इसवी सन १५०८मध्ये गादीवर आला होता. हे महल मध्ययुगीन इराणी कला व संस्कृतीची झलक दाखविते. हे उद्यान अष्टकोनी स्वरूपातील आहे. येथे एक मोठे घुमटाकार सभागृह आहे. निजाम शाही राजा या राजवाड्यात बुद्धिबळ खेळत होते.

वाचा : ‘औरंगाबाद समाचार’ : निजाम राजवटीतले उर्दू-मराठी द्वि-भाषी वृत्तपत्र

वाचा : औरंगाबादच्या नामांतरास पर्याय ‘संभाजीनगर’ नव्हे ‘अंबराबाद’!

औरंगजेबची पहिली कबर

खुलताबाद येथे औरंगजेबची कबर आहे. पण औरंगजेबचे निधन झाल्यानंतर ज्याठिकाणी त्याला इस्लामी विधीनुसार स्नान घालण्यात आले आणि पार्थिव खराब होऊ नये म्हणून पोटातील अवयव काढून दफन करण्यात आले तेथे कालांतराने एक मजार बांधण्यात आली. ही जागा शहराच्या बाहेर आहे. भुईकोट किल्ल्यापासून जवळ आहे. ही मजार औरंगजेबची पहिली कबर म्हणून ओळखली जाते.

चौथी रेजीमेंट

सन १८०३मध्ये ऑर्थर वेलेस्ली याने अहमदनगर किल्ल्यावर कब्जा केला. पण नंतर त्याने ते पेशव्यांना दिले. सन १८१७ साली ब्रिटिश लष्कराने अहमदनगर ताब्यात घेतला आणि त्यानंतर ते त्यांच्याकडेच राहिले. १८३० साली इंग्रजांचे लष्करी तळ म्हणून किल्ला ओळखला जाऊ लागला.

१८४९ साली स्थानिक शेतकऱ्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की बार्ट प्रॅक्टिस घेऊन आर्टिलरी युनिट्सनी त्यांची शेती नष्ट केली आहे. कलेक्टरांनी या तक्रारीनंतर सैन्याकडून कब्जा केलेली जमीन ताब्यात घेण्याबाबत नोटिस दिली. सन १८४९ ते १८५२ पर्यंत ब्रिटिशांनी किल्ल्याभोवती ४०० एकर जमीन हस्तगत केली आणि कॅन्टोनमेंटची निर्मिती सुरू केली.

१८८९च्या अहमदनगर गॅझेटियरमध्ये प्रकाशित केलेल्या विस्तृत माहितीनुसार, फील्ड आर्टिलरी, युरोपियन इन्फंट्रीतील आमच्या कंपन्या आणि इंडियन इन्फंट्रीची एक कंपनी अहमदनगर येथे आली होती. १९१३ साली ५०० घोडेस्वारासाठी एक स्मृती विभाग स्थापन करण्यात आला.

१८९७ मध्ये अहमदनगरमध्ये एकूण ५५९ एकर जमीन लष्कराला देण्यात आली होती. सन १९२१मध्ये सहा येथे आल्या. १९२४ मध्ये रॉयल टँक कॉर्प्स शाळेची स्थापना रॉयल टँक कॉर्प्सच्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी अहमदनगर येथे करण्यात आली.

कॅथलिक चर्च

सेंट जॉन कॅथलिक चर्च हे ब्रिटिश काळाशी संबंधित वास्तुकलेचा नमूना आहे. अठराव्या शतकात अहमदनगरमध्ये मोठ्या संख्येने सैनिकी युनिट तैनात करण्यात आले होते. परंतु त्यांच्या प्रार्थनेसाठी कोणतेही उपासन स्थळ नव्हते. त्यामुळे शेवटी अखेरीस सैनिकांना ब्रिस्टर्सने चर्च बांधण्यात आले.

इंग्रजकालीन ऐतिहासिक स्मारक असल्याने, सेंट जॉन्स चर्च हे अहमदनगरचे प्रमुख आकर्षण आहे. चर्च रजिस्टरानुसार, १८१७ मध्ये या ठिकाणी ऑक्सिलीरी हॉर्सेड कॅव्हलरी हे पहिले ब्रिटिश सैन्याची युनिट होते. नंतर १८३०पर्यंत ईस्ट इंडिया कंपनीत सैन्यतुकडी पाठविली गेली आणि हे ठिकाण एक मोठे छावणीचे तळ बनले.

चर्चच्या दफनभूमीत आपल्याला अहमदनगरमध्ये तैनात असलेल्या ब्रिटिश सैनिकांच्या अनेक कबरी सापडतात. दक्षिण-पूर्वेकडे रोमन कॅथलिक चर्च आणि एपिस्कोपलियन चर्च हे आणखीन दोन चर्च येथे जवळच आहेत. सेंट जॉन्स कॅथलिक चर्च हे अहमदनगरच्या बाहेरील भागात भिंगार भागात आहे.

वाचा : कशी होती तुघलक काळातील ईद?

वाचा : बाबरने शब्दबद्ध केलेला भारत कसा होता?

आनंद धाम

अहमदनगरची जमीन या भूमीवर जन्मलेल्या अनेक संतांनी पवित्र केली आहे. त्यापैकी एक जैन संत आनंद ऋषि आहेत. पोस्टल विभागातर्फे त्यांच्या सन्मानार्थ चार रुपयांचे पोस्टाचे तिकीट जारी करण्यात आले होते.

आचार्य आनंद ऋषी हे असे एक संत होते, ज्यांचे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान मोठे होते. त्यांचा जन्म १९०० साली शिरल चिंचंदी, अहमदनगर येथे झाला. १३व्या वर्षी रतन ऋषिजी महाराज यांच्याकडून त्यांना दीक्षा मिळाली. त्यांनी स्वतःला आध्यात्मिक उपक्रमातील जीवन व मानवतेसाठी सेवा म्हणून समर्पित केले.

त्याच्या शिकवणुकींमध्ये प्रेम, अहिंसा आणि सहनशीलतेमध्ये खोलवर रुजलेली होती. नऊ भाषांमध्ये त्यांनी प्राविण्य मिळवले होते. मराठी व हिंदी भाषांतून त्यांनी मोठ्या प्रमाणात लेखन केले. अनेक शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांची स्थापना केली आणि अनेक आरोग्य संस्थांची पुनर्रचना केली.

एक नियतकालिकही त्यांनी सुरू केले होते. १९६५ साली त्यांना ‘आचार्य’ ही पदवी देण्यात आली. सन १९९२मध्ये त्यांचे निधन झाले. आनंद धाम ही इमारत त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आली.

ऐतिहासिक संग्रालय आणि संशोधन केंद्र

अहमदनगरमध्ये एक ऐतिहासिक संग्रहालय आहे. मे १९६०मध्ये त्याची स्थापना करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील या संग्रहालयात सूक्ष्म पेंटिंग, शिल्पे, शस्त्रे, पगडी आणि हस्तलिखित इत्यादींचा एक अनोखा संग्रह आहे. गणेश मूर्तीचा विशेष विभाग आहे.

छत्रपती संभाजी महाराजांचे मूळ रंगविलेल चित्र, जर्मनीची साखळी असलेली सायकल, तांत्रिक गणपती, संस्कृत-मराठी शब्दकोश, २०० फूट लांबीची कुंडली ही या संग्रहालयाची काही आकर्षणे आहेत.

वाचा : गुरुविना घडलेले महान संगीतज्ज्ञ अमीर खुसरो

वाचा : प्रेषितांच्या स्मृती जपणारे बिजापूरचे आसार महाल

कवलरी टँक संग्रहालय

लष्कराच्या टँक संग्रहालयात ब्रिटिश शैलीतील तोफ आणि गोळे ठेवले आहेत. आर्मड कॉर्प सेंटर आणि शाळा केंद्राजवळ स्थित असलेले कवलरी टँक संग्रहालयाचा देशातील प्रमुख लष्करी संग्रहालायत समावेश होतो. या संग्रहालयाचे उद्घाटन १९९४ मध्ये बी.सी. जोशी यांच्या हस्ते झाले. हे आशियातील सर्वात मोठे लष्करी संग्रहालय आहे. अनेक राज्यकर्त्यांच्या कारकीर्दीदरम्यान वापरलेले दारुगोळा आणि शस्त्रे येथे ठेवलेले आहेत. येथे ४० देशांतील टँकदेखील आहेत.

मेहेर बाबा समाधी

मेहेर बाबा (२५ फेब्रुवारी १८९४ ते ३१ जानेवारी १९६९) (जन्मनाव मेरवान शेरियार इराणी) हे भारतीय गूढवादी व आध्यात्मिक सुफी संत होते. इसवी सन १९५४मध्ये आपण या युगातील अवतार आहोत अशी जाहीर घोषणा त्यांनी केली होती.

बालपणात त्यांच्यामध्ये अध्यात्मिक पुरुषाची कोणतीही चिन्हे दिसली नाहीत. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हजरत बाबाजान या मुस्लिम साध्वीशी त्यांचा परिचय झाला आणि सात वर्षे चाललेली आध्यात्मिक रुपांतरणाची प्रक्रिया सुरू झाली.

पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी चार आध्यात्मिक व्यक्तींशी त्यांनी संपर्क साधला. उपासनी महाराज यांच्या समवेत ते सात वर्षे राहिले. नंतर त्यांनी सार्वजनिक कार्य सुरू केले. पर्शियन भाषेत मेहेर बाबाचा अर्थ ‘दयाळू पिता’ असा होतो. सुरुवातीच्या काही अनुयायांनी त्यांना हे नाव दिले. महारोगी, गरीब, मानसिक रुग्णांसाठी त्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे.

जाता जाता :